गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१९

महिला दिन बद्दल दोन शब्द ........

       
            ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली.दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा, अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या कृतीने क्लारा झेटकिन ही कम्युनिस्ट कार्यकर्ती प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा 'जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा ठराव क्लाराने मांडला. तो पास झाला.त्या अनुषंगाने भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस (८ मार्च) १९४३ साली साजरा झाला. १९७५ हे वर्ष युनोने 'जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले, स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या; मात्र एवढ्या वर्षांत परिस्थिती काही प्रमाणात आणि काही भागातच बदललेली दिसते आहे.मग यास खर्‍या अर्थाने जबाबदार कोण?
            आपण महिला दिवस आजही प्रामुख्याने साजरा करतो पण हेतु कदाचित बदललेला नाही कारण महिला दिवस म्हणल की महिलांची खरेदी वाढावी म्हणून आकर्षक सेल ठेवतात.यावरून कुठेतरी अस दिसून येत की महिला दिवस फक्त दसरा दिवाळी ला ज्या पद्धतीने खरेदी करून उत्सव साजरा केला जातो अगदी तसाच उत्सव आपण महिला दिवस ला समजून साजरा करतो आहोत.व यामागचा उद्देश ही व्यापारी च दिसून येतो. एकंदरीत काय तर आपण महिला दिवसाचे महत्व समजून घेतलेलच नाही अस म्हणता येईल.
           आज आपल्या समाजात स्त्रियांना पुरुषांबरोबर काम करण्याचे स्थान प्राप्त झालेले आहे त्यामुळे त्यांनाही आदर मिळतो आहे.पण काही ठिकाणी आजही स्त्रियांना मानाचा दर्जाप्राप्त नाही.मग अशा ठिकाणी शिक्षित स्त्रिया देखील कानाडोळा करत अन्याय हा सहन करतात. उदा. महाविद्यालय प्रांगणा मध्ये पाहिल असता चिकू च्या बिया एवढे डोळे उघडे ठेवून मुली वावरत असताना आपणास दिसून येईल. पण त्याच मुली लहान असताना शाळेच्या मैदानात अतिशय स्वतंत्र पणे वावगत असताना दिसून येतील.मग यावरून असे वाटते की मुली मोठी होता होता पारतंत्र्यात का जातात. का त्याही समाजाचा अतिशय निडर पणाने सामना करत नाहीत?
          मान्य आहे संस्कृती पुरुष प्रधान आहे पण पुरुष घडवण्यात व त्याला संस्कृती पुरुष प्रधान आहे म्हणून शिकवण्यात ही स्त्रीच जबाबदार असते असे मला प्रामुख्याने वाटते. कारण पाल्याचा प्रथम गुरु ही एक स्त्री असते,मग त्या अनुषंगाने स्त्री का शिकवत नाही मुलास की मुली देखील तुझ्या समान आहेत व मुलीस की तूलाही परिपूर्ण स्वतंत्र आहे.
            या सर्व प्रश्नाचे उत्तर समाज आहे. पण समाज हे फक्त पुरूषांचे मिळून तयार होत नसून समाज आपणा सर्वांचे मिळून तयार होते. त्यात स्त्री यांचा ही मोलाचा वाटा असतो. त्यास्तव या समाजाची मानसिकता बदलण्याची ताकत फक्त स्त्री मधेच आहे. असे मला वाटते. त्यामुळे प्रतेक स्त्री ने महिला दिवस हा उत्सव समजून साजरा न करता समाजा प्रती आपले काही देणे लागतो या विचाराने समोर येऊन कार्य करायला हव आणि समाजात चालत आलेल्या अशा रूढी परंपरेचा त्याग करायला हवा.
            कौटिल्य ने सांगितलं आहे की पुरुषां पेक्षा स्त्रिया प्रतेक गुणांत दुप्पट असतात मग हे वाक्य ध्यानी ठेवून पुरुषांनी देखील स्त्रियांचं आदर केला पाहिजे कारण कौटिल्य सांगतात की स्त्री ही पुरुषांपेक्षा सहा पट वाईट ही असते. व आपणास ही माहीतच आहे की प्रतेक यशस्वी मनुष्याच्या मागे एका स्त्री च हात असतो. आणि त्या उलटही म्हणजेच प्रतेक बरबाद मनुष्याच्या मागे देखील स्त्री च असते त्यामुळे स्त्री यांचा आदर करा.
           कारण महाविद्यालयाच्या प्रांगणात देखील परत एकदा ती मुलगी हसत खेळत वावरली पाहिजे एवढच........ 

शनिवार, १२ जानेवारी, २०१९

मैत्री

             आज जीवनात प्रत्येकाला मोठ व्हायचं आहे. प्रत्येकाची काहीतरी स्वप्न आहेत व त्या स्वप्नपूर्ती साठी आपण अथांग मेहनत घेतो व आपण आपल्या यशाच्या शिखरावर जाऊन पोहचतो पण तिथे जेव्हा आपण पोहोचतो तिथे  आपले दूर दूर पर्यन्त कोणी नसतात.आपल्या नावाने हाक मारणार ही कोणी सोबत नसत तेव्हा मात्र आपण अतिशय तृप्त असतो स्वताचे नाव ऐकण्यासाठी व त्यावेळी आपला मित्र भेटला आणि आपलया भाषेत हाक मारली न तेव्हा आपले मन खूप आंनंदुण जाते व त्याक्षणी जो आनंद आपणास भेटतो न तो स्वप्न पूर्ती झाल्या नंतर च्या पेक्षा ही अतिशय आनंदाचा असतो.त्यामुळे जीवनात यशाचे शिखर जितके महत्वाचे तितकेच आपल्या साठी मित्र ही महत्वाचे असतात.       
      मैत्री हा शब्द आहे दोन अक्षराचाच पण खूप मोठ्या अर्थाचा.या शब्दात एक जिवा-भावाचे नाते जुळले आहे.हे नाते आपण स्वता सहवासातून बनवत असतो कारण मानव हा समाज शील प्राणी आहे. त्यामुळे जर त्याला जीवन सुंदर पद्धतीने जगायचे असेल तर त्यास कोणी तरी आपल्या जिवा भावाचा व्यक्तिमत्व असलेला जोडीदार हवा असतो.त्यास्तव अगदी लहान पासूनच आपण मित्र बनवत असतो.मित्र बनवत असताना आपण जास्त विचार करून कधीच मैत्री करत नाही व त्या विचार करून झालेल्या मैत्री ला आपण कधीच मैत्री म्हणू शकत नाही.फक्त एकदा जर मन व विचार एकमेकांशी जुळले की आपोआप मैत्री होत असते.
            आजच्या मैत्री चे स्वरूप मात्र परिपूर्ण रित्या बदलून गेलेले दिसून येत आहे. आपण मैत्री करत असताना विचार केलेला नसतो पण मैत्री निभावण्याची जेव्हा बारी अंगावर येते त्यावेळेस मात्र आपण विचार करू लागतो व त्या विचारातून आज जास्त मैत्री तुटत चालल्या आहेत.
             मित्र म्हणजे आपला दूसरा जीव ज्याला आपल्या सर्व plus & minus गुण माहीत असतात.तो आपल्या प्रत्येक सुखा दुखात पाठीशी खंबीरतेने उभा राहून आपला तमाशा होऊ देत नाही.जर कधी कुठे काही लपड किंवा भांडण झाले तर आपला साथ सोडून पळ न काढता आपला आत्मविश्वास वाढवतो आणि म्हणतो दहा खाता येईल पण दोन तरी दिल्याशिवाय माघार नाही घ्यायची असे म्हणून आपल्याला बळ देणारा जो असतो तो आपला मित्र.आपण आई वडीला पासून ज्या गोष्टी लपवून ठेवतो त्या सर्व मित्राला माहीत असल्यामुळे आई वडील देखील आपला भरोसा कमी करून मित्रावर जास्त ठेवतात कारण त्यांना माहीत असत की हा आपल्या पोरचा मित्र आहे व आपला पोरगा मैत्री करता न कदापि चुकलं नसेल पण तोच पोरगा मैत्री निभावताना खूप स्वतचा विचार करतो.
स्वार्थ आपल्या अंगी आल्यास आपण खूप सारे नाते क्षणात तोडून बसतो.त्यामुळे कळत नकळत आपण एकाकी होतो.स्वार्था पुढे आपणास माणूस दिसत नाही व आपण नात्याचा दोरा तोडून टाकतो.हा दोरा पुन्हा गाठी शिवाय जुळत नाही त्यामुळे जीवन आणि मैत्री मध्ये स्वार्थ हा आपल्या साठी खूप घातक ठरतो.
           घरात सून आल्या नंतर सासू आणि सूणे मध्ये भांडण होत असतात.कारण आईचे प्रेम असते मुलावर त्यामुळे आई ला वाटते की आपला मुलगा सून आल्या नंतर आपल्याला विसरून जाईल या प्रेमाच्या भीती पोटी  ती भांडण करते त्याप्रमाणेच जर आपल्या ही जीवनात एखादी मुलगी आली किंवा दूसरा मित्रा आला तर मित्रा सोबत सर्रास भांडण होतात.कारण आपल्या मित्रांना देखील आपली आईप्रमाणे काळजी असते.व अशा कारणावरून जर वाद झाले तर मित्रांनो तोच आपला खरा मित्र असतो कारण प्रेमात सर्व जन लहान मूल असतात त्यामुळे जे माझ ते माझ.यास्तव मित्रांनो जर का कधी अशा मित्रांसोबत आपले भांडण झाले न तर संकट समयी फक्त एक आवाज त्यांच्या साठी पूर्ण आहे ते आपल्या मागेच असतात मदतीसाठी व ते पूर्ण विसरून जाण्यास ही तयार असतात पण आपण त्या ठिकाणी नक्कीच कमी पडतो कारण दैनंदिन जीवनात आपण माणसे ओळखण्यास चुकत असतो.कोण आपल व कोण परक..
           a_c यातील रिकामी जागा भरा असे म्हटल्यास प्रत्येक जन रिकाम्या जागी b हे अक्षर लिहिणं कारण साहजिकच आहे a आणि c मधील सहवास b विना अधुरा असतो त्यासारखाच आपला मित्र किंवा आपण आपल्या मित्रा विना आधुरेच असतो.मित्रांच्या गर्दीत एकट्या माणसाला कधीच किमत नसते त्यामुळे गर्दीत आपला किमान एक तरी मित्र असला पाहिजे. यावर अब्दुल कलाम म्हणतात की -one best book is equal to 100 good friends,but one good friend is equal to a library,.......
           मान्य आहे हे सर्वांना कळत की खरच मित्र म्हणजे जीव की प्राण असतो पण आज माझ्याच डोळ्या समोरची स्तीथी पाहून मनाला खूप वाईट वाटत की अस का होत?एके काळी जीवाला जीव देणारे मित्र आज फालतू गोष्टी वरुण भांडण करतात,का दोघे एकमेकांस समजून घेत नाहीत कारण मैत्री करत असताना त्यांनी तो विचार केला नव्हता मग आज अशी का त्यांच्यावर परिस्तिथी आली की दोघे बोलत नाहीत तर माझ्या मते तो गैरसमज कारण गैरसमज हा magi सारखा असतो लगेच होतो.बर मान्य आहे गैरसमज झाला पण त्यासाठी आपण पूर्ण बोलण सोडून देतो म्हणजे खरच हा मूर्खपणा आहे. जर कदाचित गैरसमज झाला तर समोरासमोर बोलून त्यास मिटवून घ्यावे व जरि त्याने काही फरक पडला नाही तर मग मात्र त्या व्यक्ति पासून दूर झालेले अतिशय चांगले. पण उगाच मनात काहीतरी ठेऊन त्यावर रडत बसने हे काही उपयोगाचे नाही कारण यातून मानवी मनाला फक्त निराशा प्राप्त होते.व निरषेतून पुढे टोकाचे निर्णय समोर येतात त्यामुळे मैत्री करायची असेल न तर whatsapp च्या status सारखी करू नका व जर का दुशमनी करायची असेल तर चंद्र सूर्यासारखी करा कारण दुशमनी म्हटलं की आपण फक्त दुसर्‍याला ज्वलन कशा पद्धतीने निर्माण करता येईल याचा विचार करतो त्यामुळे दुशमनी तर करूच नका कारण वेळ कधी कोलांटी वुडी घेईल हे सांगता येत नाही.यामुळे दुसर्‍या व्यक्तीकडून कमी अपेक्षा ठेवा आणि आपला स्वार्थ थोडा कमी करून मैत्री हृदयातून करा व खरच हे क्षण मोलाचे याला भांडण्यात घालवू नका.
शेवटी जाता जाता -
आयुष्यात माझ्या जेव्हा.......
कधी दुखाची लाट होती
कधी अंधारी रात होती
सावली लाही भिणारी एकट्याची अशी वाट होती.....

तेव्हा फक्त मित्रा ,
तुझी आणि तुझीच साथ होती ........
                                                                               

                                                                                                                                            प-1 निलेवाड