गुरुवार, ९ जानेवारी, २०२०

वृद्धाश्रम

           आई वडील म्हणजे मला भूक लागली पासून,तुम्हाला स्वता करून खाता येत नाही का पर्यंतचा प्रवास..
           आई वडील म्हणजे तुम्ही माझ्या मनात राहता पासून,तुम्हाला वृद्धाश्रमात राहावे लागेल पर्यंतचा प्रवास.. अशी परिभाषा आधुनिक समाजाची बनत आहे.. 
             वृद्धाश्रमाचे नाव ऐकताच नवीन तरुणाईला प्रश्न पडतो जर वृद्धश्रम ही वाईट बाब तर याची निर्मितीच का झाली असेल?
             म्हणतात म्हातारपण हे दुसरे बालपण असत,पण खरच या बालपणाला दुसरी आई कुठून आणायची ? हा प्रश्न आजच्या आधुनिक तरुण वर्गाला पडतो व उत्तर म्हणून ते वृद्धाश्रम......आहेच.
         ज्याप्रमाणे अनाथ आश्रम निर्माण करण्यामागे खरेतर खूप लोकांनी विचार केला असेल. अशी मूल जी एकाकी जीवन जगतात,ज्या मुलांचे आईवडील अपघातात मरतात आणि त्यांचे नातेवाईक एका अवाजवी ओझप्रमाणे त्यांना पाहत असतात,अशा माता ज्यांना मूल नको म्हणून कचर्‍याच्या ढिगावर नवजात बाळांना सोडतात, हम दो हमरे दो च्या काळात पहिली मुलगी असताना दुसरी नको म्हणून दुसर्‍या मुलीला मंदिराच्या पायरियवर ठेवनरे नग...अशी करणे खूप आहेत,पण या सर्वांची नीचता पाहून दया येणारे देवमानसणी अनाथआश्रम ची स्थापना केली.
     अगदी तसेच वृद्धाश्रमाचे ही तसेच आहे म्हटले तरी वावगे होणार नाही.आयुष्याभर मुलांसाठी कष्ट करणारे आईवडील ऐन म्हातारपणी पोरके झाले असतील,पैसे,प्रतिष्ठा बक्कळ असूनही एकटेपणा खूपच वाईट असे जानवल्याने त्यांची निर्मिती झाली असेल.परंतु पैसा हाच सर्वस्व समजणार्‍या आधुनिक समाजात आईवडील एकप्रकारे अडगळ ठरत आहेत.त्यामुळे व्रधश्रमात वृधांची संख्या वाढत आहे..
          विज्ञान सांगत कोणताही मनुष्य 160 डीसी वेदना विव्हळत सहन करू शकतो, तर बाळाला जन्म देताना आईला 230 डीसी वेदना होतात,म्हणजेच एकाचवेळी वीस हाडे चकणचुर झाल्यावर जेवढी वेदना होते तेवढी. आई आपल्यासाठी तेवढ्या वेदना अतिशय हसत हसत सहन करते मग वर म्हटल्याप्रमाणे आपण म्हातारपणात त्यांची आई का होऊ शकत नाही?
          सर्व साधारण पने प्रतेक जन ऊत्तर देईल की सून सांभाळ करू शकत नाही व सरळ मुलाला आणि सुनेला दोष देऊन मोकळे होतात.काही बाबतीत सत्य ही असेल पण काही बाबतीत हे असत्य ही....
 तर आपण याची एक बाजू पाहूया जी कोणी पाहताच नाही - सुनांचा सासुरवास आजही सुरूच आहे. शहरी भागात काहीसा कमी असेल कारण मुली स्वताच्या पायावर उभ्या असतात. पण ग्रामीण भागात आजही सुरूच आहे. आपण हातापायत ताकत आहे तोवर घरच्या सुनेला कधी सून समजत नाही तिला कधी लेकीसारख वागवत नाही कधी ती जेवली का उपाशी आहे,कधी काम करून थकली असेल तिला ही जीव आहे हे समजत नाही.मग हेच ती जीवनभर लक्षात ठेवते आणि पुढे तुम्ही म्हातारे झाले की उचकून काढते ती तुम्हाला माफ करू शकत नाही कारण तिने जिव्ंनभर तुम्हाला सोसल असत.म्हणूनच म्हणतात न चार दिवस सासूचे चार सुनेचे.
           काही प्रमाणात हे असत्य ही आहे,आजकालच्या बदलत्या काळात सासू,सासू पना करत नाही. उलट घराची सर्व जबाबदारी स्वता उचलून,सुनेला वेळेवर ऑफिस ला धडते,मुलांची जबाबदारी स्वता उचलते.त्यामुळे सासू जर सुनेच्या मागे घर सांभाळत असेल तर सुनेने सासूचा आदर करावा. मान्य आहे घर म्हटलं की कुठ कमी जास्त होत पण त्याचा अर्थ असा होत नाही की क्षनात नाते तोडावे. लग्नाआधी माहेरी आई सुद्धा बोलते,चुकल तर मारते सुद्धा म्हणून  काही आईचा राग किंवा तिरस्कार करत नाही ना. अगदी त्यापद्धतीने सुनेने ही सासुला समजून घ्यायला हव.
         याव्यतिरिक्त मला अस वाटत की सून नाही ना सांभाळू शकत तर तेव्हा मुलगा आहेच ना. ती बाहेरून आलेली मुलगी, आता आली आहे तेव्हा मुलाने हिम्मतीने म्हणायचं की बायानो नकात भांडू.आई वडील आहेत माझे,तर तेव्हा घेईन मी काळजी,मी टाकेल सुट्ट्या दवाखान्यात नेण्यासाठी,मी सुश्रूसा करेल,आणि बायको बाई तू त्यांचं निदान जेवण बनवशील का? वर म्हटल्या प्रमाणे प्रतेक जन म्हणाल की सुना सांभाळत नाहीत.पण माफ करा आई वडील ही आधी मुला - मुलींची आणि मग सुना जवयांची जबाबदारी असते. मला मान्य आहे की म्हातारपणी ज्यांची मूल सुना आहेत त्यांच्या नशिबी येऊ नये.पण दुसर्‍याकडे बोट दाखवताना आधी आपण काय केलय ह्याचा विचार होण गरजेचं. आपल्या आई वडिलांच्या सेवेचा पुढाकार घ्यायला हवा.ती स्त्री आहे मी पुरुष,आणि बाईच एक नसत म्हणून बायको च्या अंगावर नका टाकू जबाबदारी.जिच्या उदरात वाढलो आपण तिच्याशी कसली आहे रे लाज?त्यामुळे आपल्या पालकांची जबाबदारी स्वता घेण्याची तयारी असेल तरच लोकांच्या मुलीला आपण नाव ठेवू शकतो...
शेवटी जाता जाता ....
आपल्या समाजव्यवस्थेची बाजू मला तिरस्कृत करते,
मुलीनेच का लग्न करून मुलाच्या घरी जाव ?
जो मुलगा मुलीच्या घरी जाईल,का त्याला घरजावई लेबल लागाव ?
मुलीच्या घरच्यांनी पण कधी सासरचे होऊन पहावं !
अन मुलाच्या घरच्यांनी माहेरच होऊन बघाव !

त्यामुळे आता वृद्धाश्रम का निर्माण झाले व त्यास जबाबदार कोण याचा विचार न करता ते कसे लोप पावतील यासाठी प्रयत्नशील रहा आणि आई वडिलांचा सर्व प्रथम आदर करा.......!!!!