बुधवार, ६ ऑक्टोबर, २०२१

समाज व समलिंगी आणि तृतीयपंथी

               छक्क,हिजडा,षंढ,जोगप्पा,ई. नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर चित्र उभे असणार जो शरीर यष्टीने  पुरुष अथवा महिला पण स्वभावाने स्त्री अथवा पुरुष त्यासच आपण शुद्ध भाषेत तृतीयपंथी म्हणतो. तृतीयपंथी भारतीय समाजाचा अतिशय पूर्वी पासून हिस्सा आहेत पण आपल्या गलीछ् मानसिकतेचा शिकार झाल्याने त्यांना त्यांची लढाई आजही लढावी लागत आहे. त्याबाबतच आज थोडा आपण विचार करूया,.....

               मी,तुम्ही खूप नशीबवान आहोत...का तर आपणास आपल्या लिंग बद्दल खात्री आहे. व विशेष म्हणजे आपल्याला विरुद्ध लिंगी शारीरिक आकर्षण आहे.ज्यामुळे आपण स्त्री,पुरुष या वर्गामध्ये काही न करता बायोलोजीकली विभागलेले आहोत. ज्यामुळे आपणास आपला साथीदार हा सहज मिळून जातो. पण काही क्रोमोसोमल अब्रेशन मुळे आपल्या समाजात तृतीयपंथी, समलिंगी व उभयलिंगी हि अस्तित्वात आहेत. त्यांना नैसर्गिक रित्या सम लिंगी किंवा बहुलिंगी आकर्षण असते.पण आपल्या समाजात अशा संबंधाना मान्यता नाही. मग त्यांना आपला साथीदार निवडीसाठी अतिशय सहन करावे लागते. जेव्हा बालवयात त्यांना आपण स्त्री - पुरुष नसून आपल्याला वेगळ आकर्षण आहे हे समजत त्या क्षणीच घरचे दरवाजे आपल्यासाठी बंद होतात.व तेथून चा प्रवास आपण कल्पना करू शकत नाही.भारता मध्ये २५ लाख तृतीयपंथीय आहेत व त्यातील 2 लाख हे एडस् या आजाराचे शिकार आहेत.याचे मूळ कारण हेच कि त्यांना समाज मान्यता नसल्यने त्यांनी prostitution तसेच अन्य घातक पर्यायांचा वापर केला.  

               भारतीय संविधानाच्या सरनाम्या मध्ये न्याय : सामाजिक,आर्थिक व राजकीय असा उल्लेख आहे.तसेच कलम १४ कायद्यापुढे समानता. यानुसार त्यांना समाजात हक्क मिळायला हवा पण भारतीय दंड संहितेच्या (१८६०) सेक्शन ३७७ नुसार निसर्गाच्या विरुद्ध केलेली कोणतीही क्रिया त्यास गुन्हेगार संबोधले जाईल असे १८६१ मध्ये नमूद करण्यात आले. पण याचा अर्थ समलैंगिक संबंध हे कायद्याने गुन्हा आहे हे ठरवण्याचे कार्य समाजाने केले. times of India च्या report नुसार २०१६ मध्ये भारतामध्ये १४९१ जणांना ३७७ अंतर्गत अटक करण्यात आलेली होती त्यात २०७ नाबालिक व १८ महिला यांचा समावेश होता.ज्यामुळे साहजिकच त्या सर्वांच्या मुलभूत हक्काचे हनन होत होते. 

२०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालय ने कलम २१ अंतरगत व्यक्तीचा खाजगी अधिकार असल्याचे नमूद केले व कदाचित त्यामुळेच २०१८ मध्ये सर्वोच न्यायालयाने २०१४ मधील निकाल ओवररूल करून LGBTQ समुदायास लिंग चा दर्जा मिळवून दिला. व त्या अनुषंगाने भारतीय संसदेने २०१९ मध्ये कायदा हि तयार केला. 

                आज लिंग चा दर्जा मिळून देखील त्यांना सर्व अधिकार समाजामार्फत मिळालेले अद्याप नाहीत. रेल्वे किंवा अन्य ठिकाणी पैसे मागण्यास आल्या नंतर आपण त्यांना हाकलतो किंवा अतिशय खालच्या दर्जाचे म्हणत तुच्छ् तेणे आपण त्यांच्यासोबत व्यवहार करत असतो पण घरात मूल जन्माला आल्या नंतर त्याला आशीर्वाद मात्र आपण तृतीयपंथीय कडून घेतो.... 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any dought,suggestion please comment