काल मी इस्त्री वाल्याकडे कपडे आणण्यासाठी गेलेलो. थोडा वेळ लागणार होता.त्यामुळे त्याच्या जवळील बाकावर मी बसलो. एवढ्यात त्याने प्रश्न केला, काम काय करता ? मी हसत उत्तर दिल, नाही काका... आणखी मी शिकत आहे. अच्छा, काय शिकत आहेस मग ? मी म्हटलं माझ M.A. चालू आहे. त्यावर त्याने तोंड हिरमुडत हुं, मग काही कामाचं नाही, असं माझ्या सरळ तोंडावर म्हटलं.... ते बरोबर हि होत, कारण वडिलांना मदत करण्याच्या वयात मी शिक्षण घेत आहे व ते जे सर्वाना माहिती कि यातून काही होणार नाही. पण महत्व आहे त्या पास झालेल्या कागदाला, एवढच...
आज आपल्या अभ्यासक्रमात पर्यावरण जन जागृती साठी विषय आणला आहे, पण सर्व विद्यार्थी त्याला अभ्यासक्रमाचा विषय समजून फक्त पास होण्याचा प्रयत्न करतात. त्यातून मिळणारे ज्ञान आपल्याला काहीच गरजेचे वाटत नाही. त्यामुळे प्रदूषण अभ्यास करून हि आपण बुलेट वरून फेरफटका मारतो तर प्रदूषण चा विचार न करता शेतकरी शेतात पाणी सोडून रात्र भर झोपतो.त्यामुळेच कदाचित शिक्षित व अशिक्षित आज पर्यावरण रक्षण करण्यामध्ये एकाच रेषेत आहेत.
आपल्या कडे १८ वयोवर्ष असलेली व्यक्ती प्रौढ मानली जाते व अनुसरून सरकार निवडण्यामध्ये योगदान देते.पण त्याच व्यक्तीला २१ वर्ष असल्याखेरीज लग्न करता येत नाही व त्याच व्यक्तीला एखादी नोकरी मिळवण्यासाठी UG,PG करावी लागते तेव्हा वय वर्ष २४ इतके होते. म्हणजे स्वताच्या पायावर उभे न राहता हि आम्हाला सरकार उभारण्यात योगदान देता येत यावरून हेच सिद्ध होत.
जेव्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायाचा असतो, तेव्हा त्याची पहिली पायरी म्हणजे ५ ते १२ वर्गाची पाठ्यपुस्तके वाचणे. म्हणजे परत एकदा शालेय वयात ज्या चुका केल्या त्या सुधारण्यासाठी वेळ द्यावा लागतो. थोडक्यात काय तर ज्ञानार्थी व्हाव लागत. मग ५ - १२ दरम्यान शालेय जीवनात विद्यार्थ्याला शाळा नंतर extra class,या साठी पालक किती तरी खर्च करतात ते हि फक्त परीक्षार्थी बनविण्यासाठी कारण आपण विद्यार्थ्याचे ज्ञान न पाहता कागद पाहतो. यामुळे एवढा वेळ आणि पैसा आपणास खर्च करावा लागतो.
IIT सारख्या प्रतिष्ठित संस्था मध्ये प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थी कमी वयात आपले सर्वस्व पणाला लावून तयारीला लागतात. पास होतात व प्रवेश हि मिळवतात पण आयुष्याच्या युद्धात लवकर अपयश पत्करून आयुष्य संपवतात. म्हणजे यात हि आपण कुठेतरी चुकत आहोत. विद्यार्थ्याला परीक्षा हेच आयुष्य नसून त्यापलीकडे भरपूर काही आहे हे आपणास शिकवता आल पाहिजे.
१०,१२ वी नंतर पाहतो सर्व विद्यार्थी पालक नामांकित महाविद्यालय मध्ये प्रवेश मिळावे यासाठी प्रयत्न करतात. याबद्दल काहीच आक्षेप नाही, पण पुढे ज्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला नाही त्याला अपयशी ठरवणे हे चुकीचे आहे. जर नामांकित महाविद्यालय हेच यशाचे प्रतिक आहेत तर जिल्हा परिषद शाळा किंवा अन्य महाविद्यालये यांच्या स्थापनेचे महत्वच काय ? तसेच नामवंत महाविद्यालय मध्ये प्रवेशासाठी किमान 98 % अश्या विशिष्ट प्रकारची अट असते. जर असे असेल तर शासनाने पास होण्यासाठी ठरवून दिलेले 35% काय कामाचे. कारण जर 98 % मिळाले नसतील तर त्या महाविद्यालय च्या प्रमाणे तुम्ही नापासच आहात.पण हे एवढे % घेवून त्या महाविद्यालय मधील सर्व विद्यार्थी यशस्वी होतात असेही नाही.
वरील सर्व कारणे अभ्यासता हे सांगता येईल कि खरेच आपल्या शिक्षणव्यवस्थे मध्ये दोष आहेत. पण ते आपणासच दूर करावयाचे आहेत त्यामुळे पालकांना व विद्यार्थ्यांना आणि पुढील पिढी घडविणाऱ्या शिक्षकांना हीच विनंती आहे कि विद्यार्थ्याला परीक्षार्थी न बनवता ज्ञानार्थी बनवलं पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any dought,suggestion please comment