पुरुष प्रेम देतो शरीरासाठी
स्त्री शरीर देते प्रेमासाठी
या वाक्यतून पुरुष-प्रधान संस्कृती ल नक्कीच ठेच लागली असेल. पण करणार काय,आज वास्तव हेच आहे....
आपली संस्कृती बदलत आहे. पेहराव,राहणीमान,दृष्टीकोण बदलत आहेत.हे स्वागतार्ह आहे....पण याच सोबत आपले विचार,आचार,रूढी,परंपरा बदलत नाहीत याची खंत आहे.... त्यापैकीच एक कौमार्य / verginity ही एक आहे.ज्यामुळे एका स्त्री ला मानसिक त्रासास सामोरे जावे लागते.कौमार्य विषयी ग्रामीण व शहरी भागात विविध संकटांना मुलींना सामोरे जावे लागते.....
आपल्या पैकी बर्याच जणांना कौमार्य हा शब्द माहीत नसला तरी verginity हा शब्द नक्कीच माहिती आहे कारण एखाद्या मुली संदर्भात मुलांमध्ये विषय निघल्यास जास्त याचीच चर्चा होते व आपल्या सर्वांचा आवडता curious असलेला हा विषय आहे. त्यामुळे नक्कीच याविषयी सर्वांना माहिती आहे. तरी कौमार्य म्हणजे - एखाद्या व्यक्तीने यापूर्वी कधीच शारीरिक संभोग केलेला नाही असा होतो. हा छोटासा शब्द स्त्रीयांचे चरित्र ठरवत असतो.जर कौमार्य शाश्वत असेल तर ती मुलगी चारित्र्यवान अन्यथा तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो.
आज आपण आधुनिक युगात राहतो म्हणजे थोड्या फार प्रमाणात स्त्री-पुरुष समानता आहे.त्यामुळे एखादी मुलगी लग्न पूर्वी आपल्या प्रेमी सोबत शारीरिक होऊ शकते.ज्यान्वये कौमार्य लोप होऊ शकतो. पण तिने शारीरिक झाली म्हणून तिला चरित्रहीन कस काय म्हणता येईल. कारण तेच कृत्य पुरुषाने केल तर त्याला समाज मान्यता आहे पण स्त्रियांना मान्यता नाही.बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती चा दहन केला पण आज आणखी आपण त्याला आपल्या मनात बाळगत आहोत हे यातून प्रकर्षाने दिसून येतो.व याचा परिणाम मुलींच्या आयुष्यावर फार मोठ्या प्रमानात होतो.
अलीकडे आपल्या संस्कृती मध्ये live in relationship ही प्रेमी युगुलांची प्रथा फार मोठ्या गाजत आहे.यामध्ये असत तर काय? तर एखाद प्रेमी जोडप लग्ना आधी एकमेकांना समजून घेण्यासाठी एकत्र राहतात.या प्रथेचे स्वागत आहेच....पण एखादी वेळेस एकत्र राहण्याच्या भावनेतून आणि प्रेमी संबंधातून मुलगा आणि मुलगी शारीरिक होतात.यात ही काही दोष नाही. पण जेव्हा तो मुलगा त्या मुलीला सोडून जातो तेव्हा तिच्याकडे आत्महत्या किंवा वेश्या व्यवसाय या शिवाय दूसरा पर्याय कोणता नसतो. कारण समाज मान्यता देत नाही. त्यानंतर त्या मुलीने जरी दुसर्या व्यक्तीशी लग्न केले तरी ती मानसिकरीत्या पूर्णता तयार नसते,तिने ज्याच्यावर प्रेम केलेलं होत त्याला ती सर्वस्व दिलेल असत. यात कौमार्य चाचणी सारख्या कुप्रथा यांनी तर तिचे जीवन पूर्णता नर्क बनते.
तर हा उल्लेख फक्त live in relationship संदर्भात नाही तर आपल्याकडे पोराड वयात जे प्रेम होत त्यासंदर्भात ही आहेच. त्या वयात फक्त या विषयाची curiosity असते त्यातून त्याविषयी वाट्टेल ते ज्ञान मिळवण्याचा जिवापाड प्रयत्न करतो. अन त्यातच शरीराची वाढ होत असल्याने विरूद्ध लिंगी आकर्षण मोठ्या प्रमाणात होते.व शारीरिक मुला - मुलींमद्धे पुरेशी समज नसल्याने शारीरिक संभोग म्हणजेच प्रेम करणे असा अर्थ लावून त्या वाटेकडे ते वळतात.
व पुन्हा चूक लक्षात येता आणि समाज यांना सामोरे जाण्याच्या भीतीने मुलींकडे आत्महत्या करणे हाच एक पर्याय असतो.कारण समाज स्त्री कडे फक्त एक वस्तु म्हणून पाहतो. व ती वस्तु त्यास कोरी कर-करीत लागते......यामुळे अशा स्थिति मधून जाणार्या बहुतांश मुली अयोग्य मार्गावर जात असल्याचे आपणास दिसून येते. त्यामुळे बाबांनो प्रेम करा.... त्यास पूर्ण पाठिंबा आहे,पण थोड प्रेमाची व्याख्या अगोदर बदला जेणेकरून एखाद्या मुलीचे जीवन उध्वस्त होणार नाही.....
याच सोबत आजच्या शतकात ही काही कौमार्य संबंधी कुप्रथा आपल्या भारत देशात च काय तर जगभरात आहेत फक्त नावे वेगवेगळी आहेत...कौमार्य चाचणी,verginity test,red apple test,two finger test. ई.
यापैकी भारतात कौमार्य चाचणी आहे जिच्यामुळे आजही समाजात स्त्री ला वाळीत टाकले जाते ज्यामुळे ती आत्महत्या करते.
स्वतंत्र भारतात एकविसाव्या शतकात कंजारभाट समाजात स्त्री 'व्यभिचारी' आहे की नाही, हे ठरवणारी कौमार्य चाचणी लग्नानंतर घेतली जाते.व अरेंज मॅरेज करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ही कौमार्य चाचणी द्यावी लागते. कित्येक वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे. जग कितीजरी पुढे गेले असले तरी अजुनही काही समाज आपल्या प्रथांमध्ये घुटमळत आहेत. त्यांच्या या घुटमळीत कुठेतरी मुलींच्या सन्मानाचा आणि अभिमानाचा बाजार मांडला जातोय हे नक्की.लग्नाच्या पहिल्या रात्री केली जाणारी ही कौमार्य चाचणी! लग्न झालं की त्या रात्री पती पांढरीशुभ्र चादर घेऊन नववधू असलेल्या खोलीत जातो. बिछान्यावर ही चादर पसरली जाते. शरीरसंबंध झाला की त्या चादरीवर रक्ताचा डाग पडणं सक्तीचं. (ते झालं नाही की ती 'नव वधू' खोटी.) जे काही असेल ते घेऊन तो नवरा मुलगा दुसऱ्या दिवशी सकाळी खोलीच्या बाहेर येतो. पंच मंडळी निवाड्याला बसलेलीच असतात. ते विचारतात, ‘रात्री जो माल तुला दिला होता, तो कसा? खरा की खोटा?’ इतक्या गलिच्छ भाषेत एका स्त्री चा म्हणजेच नव्या नवरीचा अपमान केला जातोय. अशा प्रकारे कौमार्य चाचणी केली जाते. त्यात वधू आणि वर चा पूर्ण खासगीपणा पायदळी तुडवला जातो. आन जर डाग आढळला नाही तर ती चारित्र्यहीन समजून त्रास दिला जातो. किंवा घटस्फोट घेतला जातो. पण ते ही इतके सोपे नाही कारण त्या स्त्री ला पूर्णता वाळीत टाकण्यात येत.चारित्र्याहीन हा टॅग ही दिला जातोच. यामुळे साहजिकच त्या स्त्री पुढे कोणताच पर्याय उपलब्ध नसल्याने ती आत्महत्या करण्यास योग्य मानते व या बांधील समजपासून आपले जीवन संपवते. या अशा अगदी क्षुल्लक शारिरीक चाचणीचा बाऊ करुन किरकोळ निकषावर हे लोक मुलींना आरोपी का ठरवतात तेच कळत नाही. उच्चशिक्षीत वर्गातही 'आर यु व्हर्जिन' असे प्रश्न मुलीला विचारले जातात ही देखील एक गंभीर बाब आहे.
मुळात ही जी पद्धत आहे ती विज्ञानाच्या निकषावर रास्त आहे कारण यौनपडदा फाटण्यासाठी अनेक कारणे आहेत. नियमीत व्यायाम, योग, सायकलिंग, ट्रेकिंगमुळे कधी-कधी यौनपडद्याला इजा होऊ शकते. तसेच यासोबत जंतुसंसर्गामुळेही यौनपडद्यावर परिणाम होत असतो. मुलीचे खेळणे, अपघातही त्याला कारणीभूत असू शकतात. मात्र समाजातील बुरसटलेल्या वृत्तीच्या लोकांना ही कारणे पटत नाही. कारण अजुनही समजाच्या मनात स्त्री दुय्यम स्थानी आहे. अजुनही अशा प्रथांमध्ये समाज घुटमळत असल्याचे चित्र पाहायला मिळते.
१९९६ साली कौमार्य चाचणीविरोधात कृष्णा इंद्रेकर आणि अरुणा इंद्रेकर या कंजारभाट समाजातल्या जोडप्याने आवाज उठवला होता. पण त्याचा परिणाम अधिक झाला नसल्याचे पाहायला मिळत आहे. ही प्रथा केवळ महाराष्ट्रातच नसून अन्य राज्यातदेखील आहे. राजस्थानमध्ये ही प्रथा ‘कुकरी प्रथा’ म्हणून ओळखली जाते. . राजस्थानात वास्तव्य करणाऱ्या ‘सांसी’ समाजात ही कुप्रथा कायम असून आजही या विकृतीमुळे अनेक तरुण मुलींना त्रास भोगावा लागतो.
यामुळे आता खरी गरज आहे आपण जागे होण्याची, किती दिवस या अशा कारणाने आपण स्त्रियांचं जीव घेणार.व आपमन्स्पद वागणूक त्यांना देणार..... पुरे झाला रे हा लज्जास्पद खेळ. त्यामुळे समाज बदलण्यासाठी आजच आहे ती योग्य वेळ.......
मान्य आहे मलाही की ही प्रथा पूर्ण समाज अस्तीत्वात आल्या पासून ची आहे मग एका रात्री तुन अथवा असे लिहिल्याने जाणार नाही,पण आपल्या समाजात काय होत आहे या कुपर्थांचा आपण थोडा विचार केलाच पाहिजे,ज्यातून पुढे समाज प्रबोधन होऊन एखाद्या मुलीचे प्राण वाचवता येतील त्या उद्देशाने हे लिखाण करण गरजेचं......
शेवटी जाता जाता,
खरच प्रेमाची व्याख्या तुम्ही बदलू नका,
प्रेम ही एक सुंदर भावना आहे.....
जेव्हा प्रेम होईल तेव्हा जगाचा विसर पडून संपूर्ण जग सुंदर भासेल.......
- प 1 निलेवाड